महाराष्ट्र

ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती.. ; प्रताप सरनाईक

मुंबई: ई-वाहन क्रांती म्हणजे केवळ वाहतूक क्षेत्रातील बदल नसून, स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबईच्या निर्मितीचा मार्ग आहे.पर्यावरणपुरक नव्या मुंबईची निर्मिती ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा बदल यशस्वी होईल असा विश्वास  प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

मुंबईमध्ये आज “Wheels of Change – Understanding EV Adoption for Mumbai’s Auto & Taxi Drivers” या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरनाईक बोलत होते.

या कार्यक्रमास परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव डॉ. अविनाश ढाकणे, World Resources Institute, India चे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव पाई तसेच मान्यवर उपस्थित होते.

सरनाईक म्हणाले की, राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत मुंबईसह महाराष्ट्राला हरित वाहतुकीचे केंद्र बनवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. या उपक्रमात ऑटो व टॅक्सी चालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
इलेक्ट्रिक वाहने ही केवळ पर्यावरणपूरक वाहतूक साधने नसून सार्वजनिक वाहन चालकांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे साधन आहेत. इंधन दरातील चढ-उतारांपासून मुक्ती आणि अधिक उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे हे ई-वाहनां चे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.
भविष्यात स्वच्छ, निरोगी आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.असे प्रतिपादन सरनाईक यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!