दिलासादायक:मुंबईत कोरोना होतोय झपाट्याने कमी..
मुंबई,दि.१०:महाराष्ट्रात व मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा निश्चित पणे हळूहळू कमी होताना दिसत आहे. मुंबईत शनिवारी २,६७८ रुग्ण सापडले, काल रविवारी २,४०३ रुग्ण सापडले, तर आज सोमवारी १,७८२ रुग्ण सापडले. त्यामुळे सावकाश, पण खात्रीपूर्वक रुग्णसंख्या कमी होत आहे, असे म्हणावयास वाव निर्माण झाला आहे.
सध्या आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज आढळलेल्या रुग्णांपेक्षा दुप्पट संख्येने रुग्ण कमी झाले. आज आढळले १,७८२ तर ३,५८० बरे झाले. आढळलेल्या रुग्णांची एकूण संख्या ६,७८,२६९ झाली असून, बरे झालेल्यांची एकूण संख्या ६,१६,९९८ झाली. आज ७४ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या १३,८९१ झाली.
मुंबईत सध्या ४५,५३४ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांची घटणारी संख्या दिलासादायक आहे.
आज राज्यात 61,607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज नवीन 37,326 रुग्णांचे निदान झाले आहे. जवळपास महिन्याभरानंतर कोरोना रुग्णांचा एका दिवसातला आकडा 40 हजारांच्या खाली आला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 44,69,425 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण (Recovery Rate) 86.97 टक्के झाले आहे. आज राज्यात 37,326 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर आज 549 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे.