महाराष्ट्र

रिफायनरीच्या समर्थनार्थ विधानभवनावर धडकणार मोर्चा

राजापूरवासीयांना एकत्र येण्याचे आवाहन

मुंबई: राज्याच्या कठीण आर्थिक स्थितीत कोकणात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुले समर्थन दिलेले असतानाच आता मुंबईस्थित तालुकावासीय आणि मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी प्रकल्पासाठी राजापूरवासीयांना आंदोलनाची हाक दिली आहे.

राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्प एका माणसाच्या हट्टामुळे थांबल्याची तोफ डागत येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानभवनावरच प्रचंड मोर्चा काढण्यासाठी एकत्र या असे आवाहन त्यांनी तालुक्यातील सर्वपक्षीयांना केले आहे.

काही महिन्यांपूर्वी तालुक्यात रिफायनरी प्रकल्पासाठी जे राजकीय पक्ष एनजीओंच्या प्रभावामुळे विरोध करीत होते त्यापैकी शिवसेना वगळून इतर सर्वच राजकीय पक्ष रिफायनरीचे समर्थन करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!