महाराष्ट्र

राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई:व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यंदा शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार, तर खासगी आयटीआयमध्ये ४४ हजार अशा एकूण १ लाख ३६ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

राज्यातील आयटीआयमध्ये प्रवेशासाठी एकूण ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यापैकी ८० अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण, तर ११ अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतील. प्रवेश प्रक्रिया, नियमावली, आवश्यक कागदपत्रे, संस्थांची यादी, अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता माहिती https://admission.dvet.gov.in या संके तस्थळावर उपलब्ध आहे. तसेच महाआयटीआय या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारेही प्रवेश अर्ज भरता येईल.

डीव्हीईटी आणि राज्य मंडळ यांच्यातील करारानुसार दहावीच्या सर्व परीक्षार्थ्यांची माहिती डीव्हीईटीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी अर्ज भरताना दहावीच्या परीक्षेचा बैठक क्रमांक नमूद के ल्यास विद्यार्थ्यांची सर्व माहिती प्रवेश अर्जात आपोआप भरली जाईल. प्रवेश अर्जाचे शुल्क भरण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने कागदपत्र तपासणी, प्रवेश अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी प्रत्यक्ष संस्थेत जाण्याची गरज नाही. दहावीचे गुण आणि प्रवेश नियमावलीनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया २९ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, दहावीचा निकाल जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांचा विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता. आता निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना प्रतिसाद वाढू शके ल. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना https://polysr.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळाद्वारे २९ जुलैपर्यंत अर्ज करता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!