
पणजी:गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी नुकत्याच दोन अल्पवयीन मुलांवर झालेल्या बलात्कार प्रकरणावर बोलताना अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले आहे. . मुली रात्रभर बीचवर फिरतात. त्याची जबाबदारी पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही. त्यांनी आत्मपरिक्षण करावं, असे मत प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे गोव्यात चर्चेला उधाण आलंय. विरोधकांनी सरकार जबाबदारी झटकू शकत नाही असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.