महाराष्ट्र

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून राजस्थानातील अजमेर ते गोव्यातील वास्को द गामा जंक्शन दरम्यान विशेष गाडी कोकण रेल्वे मार्गावरून धावणार

मुंबई- कोकणकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून राजस्थानातील अजमेर ते गोव्यातील वास्को द गामा जंक्शन दरम्यान विशेष गाडी धावणार आहे.कोकण रेल्वे मार्गावरून जाताना ही गाडी खेड, चिपळून, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ तसेच सावंतवाडी स्थानकांवर स्टॉप घेणार आहे.

कोरोना काळात अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामुळे ख्रिसमसला गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची ट्रेनमध्ये गर्दी होऊ शकते, प्रवाशांची गैरसोय टळावी यासाठी ही स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आली आहे.नवी वर्षाचे स्वागत तसेच ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ही गाडी आठवड्यातून एकदा चालवण्यात येणार आहे.

( 09619-09620) ही गाडी अजमेर ते वास्को द गामा जंक्शन दरम्यान येत्या 25 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान धावणार आहे. ही ट्रेन शनिवारी सकाळी नऊ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी नऊ वाजता गोव्यात पोहोचेल. साधारणपणे हा एक दिवस म्हणजेच 24 तासांचा प्रवास असणार आहे. ती अजमेरवरून येताना कोकण रेल्वे मार्गावर खेड, चिपळून, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ तसेच सावंतवाडी स्थानकांवर स्टॉप घेणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!