ब्रेकिंग
जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय झाले कोविड समर्पित रुग्णालय

मुंबई:- मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय हे कोविड समर्पित रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी दिली आहे.
आजपासून पुढील सूचना मिळेपर्यंत या रुग्णालयातील अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभाग तसेच शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबईमहानगर पालिकेच्या व्यवस्थापनाखाली असलेले हे रुग्णालय पूर्णपणे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.
यासंदर्भातील परिपत्रक या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने प्रसिद्ध केले असून मुंबई पश्चिम उपनगरचे अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले आहे.