मंत्री आदित्य ठाकरे यांनी शब्द दिला आणि पूर्णही केला,’त्या’ गावात जाऊन आदित्य ठाकरेंनी केलं पेयजल योजनेचं आणि पुलाचं उद्घाटन

नाशिक:- राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत नाशिकमधल्या खरशेत येथील स्त्रियांना पाणी आणण्यासाठी कशी तारेवरची कसरत करावी लागते, यासंदर्भातील वास्तव दाखवून त्यांच्यासाठी लवकरात लवकर उपाय योजना करू असे आश्वासन दिले होते.
या ध्येयासाठी विशेष योजना केल्याबद्दल पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील जी यांचे आभार मानतो. आपल्यापर्यंत न पोहचणारे असेही काही आवाज आहेत. त्याकडे आपण लक्ष द्यायला हवे. आपली शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करताना त्यांच्या गरजा सुद्धा पूर्ण करणे आवश्यक आहे. pic.twitter.com/v3aFOnayBc
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 28, 2022
यानंतर काल त्यांनी नाशिक जिल्ह्यातील खरशेत या गावामध्ये जाऊन तेथील गावकऱ्यांना दिलासा दिला.तसंच खरशेतमध्ये पेयजल योजनेचं देखील त्यांनी उद्घाटन केलं. आदित्य ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्यामुळे तेथील गावकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
याच सोबत आदित्य ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी या गावातील नदीवर पूल बांधून आपला जीव धोक्यात घालणाऱ्या स्त्रियांना देखील दिलासा दिला आहे. या गावातील स्त्रिया आपला जीव मुठीत घेऊन बांबूच्या साहाय्याने नदी ओलांडतानाचे दृश्य काही व्हायरल फोटो मधून पाहायला मिळालं होतं. याचीच दखल घेत आदित्य ठाकरे यांनी या गावातील स्त्रियांना तसंच गावकऱ्यांना पूल बांधून दिला आहे.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी गावकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्यासोबत पेयजल योजनेचा तुम्हाला कसा लाभ होईल याविषयी माहिती दिली.