महाराष्ट्रमुंबईराजकीयशासकीय अध्यादेश
राज्यातील सर्व दुकानांवर आता मोठ्या अक्षरात झळकणार मराठी पाट्या
विधिमंडळात सुधारणा विधेयक झाले मंजूर…

मुंबई:महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ च्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. यामुळे राज्यातील सर्व छोट्या मोठ्या दुकानांवर मराठी भाषेतून (देवनागरी लिपीत) पाट्या झळकतील. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी याचे स्वागत केले.
यापूर्वी दहापेक्षा कमी कामगार दाखवून कायद्यातून पळवाट काढली जात होती. ती आता पूर्णपणे थांबणार आहे, असेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या कायद्यात सुधारणा झाल्यामुळे मराठी भाषेतील अक्षरे नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असणार आहे. मराठी भाषेतील अक्षरांचा टंक, आकार इतर भाषेतील अक्षरांच्या टंकापेक्षा मोठा ठेवावा लागणार आहे.