मुंबई

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजाच्या २१ लाभार्थ्यांना मिळणार हक्काची घरे

घरकुल बांधणीचा निधी लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा होणार
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा पाठपुरावा

मुंबई –  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतंर्गत धनगर समाजासाठी घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजाच्या २१ लाभार्थ्यांना या घरकुल योजनेतंर्गत हक्काची घरे मिळणार आहेत. याबाबतच शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाने आज प्रसिध्द केला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या योजनेंतर्गत भटक्या जमातील – क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सदर योजना ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येणार आहे. सदर योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जिल्हास्तरिय समितीने सिंधुदुर्ग जिल्हयातील धनगर समाजातील २१ जणांना घरकुल योजनेचा लाभ देण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे धनगर समजातील लाभार्थींना या योजनेचा लाभ होणार आहे. त्यानुसार प्रति लाभार्थींना रु.१ लाख २० हजार याप्रमाणे एकूण २५ लाख २० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सार्वजनिक वित्तीय व्यवस्था प्रणालीद्वारे थेट लाभार्थी वितरण पध्दतीने (डीबीटी) बांधकामाच्या टप्प्यानुसार, टप्प्याटप्प्याने थेट जमा होणार आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतंर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजाच्या बांधवांसाठी या याजनेचा लाभ मिळावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या खात्याचे मंत्री अतुल सावे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे या निर्णयाबद्दल मंत्री चव्हाण यांनी मंत्री अतुल सावे यांचे आभार मानले आहे. तसेच खासदार नारायण राणे यांचेही मंत्री चव्हाण यांचे आभार मानले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या २१ पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे त्याची नावे खालील प्रमाणे,
१ रविंद्र बाबुराव बांबर्डेकर ( कुडाळ-वेताळबांबर्डे)
२ राजाराम रामचंद्र एडगे (कुडाळ-गोठोस)
३ सुभाष गंगाराम कोकरे ( कणकवली-साळीस्ते)
४ सुरेश लक्ष्मण जानकर ( कुडाळ-गोठोस)
५ चंद्रकांत सोनू जंगले (दोडामार्ग-झरेबांबर)
६ विठोबा नारायण वरक (मालवण-काळसे)
७ सुरेश तुकाराम धनगर (कुडाळ-परबवाडा)
८ राजन जानू झोरे (दोडामार्ग-कुडासे)
९ सागर सोनू वरक (कुडाळ-नेरूर)
१० विजय जानू जंगले (सावंतवाडी-सरमळे)
११ सिध्देश रामचंद्र शिंदे (देवगड-दाभोळे)
१२ जनार्दन बमू खरात (देवगडशिरगाव)
१३ मलो सखाराम खरात (दोडामार्ग-वझरे)
१४ कृष्णात भैरू झोरे (मालवण-वडचा पाट)
१५ नवलू पांडूरंग झोरे (वैभववाडी-आचिर्णे)
१६ अनंत पांडूरंग एडगे (कुडाळ-गोठोस)
१७ नामदेव जानू जानकर (कुडाळ-गोठोस)
१८ लक्ष्मण भैरू पाटील (सावंतवाडी-आंबेगाव)
१९ रामदास विठू जंगले (सावंतवाडी-आंबेगाव)
२० नवलू भागू झोरे (सावंतवाडी-आंबेगाव)
२१ प्रशांत रामा झोरे (कुडाळ-वेताळबांबर्डे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!