कोकण रेल्वेच्या गाड्या आजचा दिवस नव्या वेळापत्रकानुसार

रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात दिवाणखवटी स्थानकाजवळ दरड कोसळल्याने बंद झालेला मार्ग लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. ती लक्षात घेऊन गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्यांचे आजच्या दिवसाचे वेळापत्रक कोकण रेल्वेने जाहीर केले आहे.या गाड्यांमध्ये मडगाव हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव मुंबई कोकणकन्या, सावंतवाडी दादर तुतारी, मडगाव एलटीटी विशेष गाडी या गाड्यांचा समावेश आहे.
आजच्या दिवसापुरते बदललेले वेळापत्रक असे : मडगाव हजरत निजामुद्दीन 22413 क्रमांकाची गाडी सकाळी आठऐवजी सायंकाळी साडेचार वाजता, मडगाव एलटीटी 11100 क्रमांकाची सकाळी साडेअकरा वाजता सुटणारी गाडी सायंकाळी साडेसहा वाजता, मडगाव मुंबई 20112 क्रमांकाची सायंकाळी साडेसहा वाजता सुटणारी कोकणकन्या एक्स्प्रेस गाडी रात्री साडेअकरा वाजता, मडगाव मुंबई 12052 क्रमांकाची जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी बाराऐवजी रात्री साडेआठ वाजता, सावंतवाडी दादर 11004 क्रमांकाची तुतारी एक्स्प्रेस सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटानऐवजी रात्री साडेदहा वाजता सुटणार असल्याचे कोकण रेल्वेने सांगितले.