ब्रेकिंग

मुंबईतील कोरोनाबाधितांपैकी ८० टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित-आयुक्त चहल

मुंबई – राज्यात विशेष करून मुंबईत कोरोना संसर्गाने आपलं डोकंवर काढलं असून राज्याच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. अशातच ओमायक्रॉनमुळे मुंबईच्या चिंतेत अधिक भर पडताना दिसून येत आहे. त्यातच मुंबईत आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या स्पाईकमध्ये ओमायक्रॉनचाच हात असल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे. एनडीटीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत असताना डॉ. चहल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सध्या मुंबईत आढळत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल ८० टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित असल्याची माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या तज्ञांनी दिल्याची माहिती डॉ. चहल यांनी या विशेष मुलाखतीत दिली आहे. असं असलं तरी सध्या तरी ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई महापालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन तसंच होम क्वारंटाइन करण्यासाठी विशेष प्रोग्राम राबवल्याची माहितीही डॉ. चहल यांनी यावेळी दिली. मुंबईच्या कोविड पॉजिटिव्हिटी रेटमध्ये २१ डिसेंबरपासून वाढ होत आहे. त्याला आज १४ दिवस झाले आहेत. २१ डिसेंबरपूर्वी मुंबईचा पॉजिटिव्हिटी दर एक टक्क्यांपेक्षा कमी होता. त्यानंतर आज चौदाव्या दिवशी मुंबईचा कोरोना वृद्धी दर हा १७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

सध्या मुंबईत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण ७ डिसेंबर रोजी सापडला होता. त्यापूर्वीच केंद्राच्या ओमायक्रॉन बाबत गाईडलाईन्स मिळाल्याने मुंबई महापालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत खास होम क्वारंटाइन प्रणाली सुरु केली. ३ डिसेंबर म्हणजे आजपासून बरोबर एक महिन्यापूर्वीच मुंबई महापालिकेने ओमायक्रॉनबाबत ही क्वारंटाइन प्रणाली राबवायला सुरुवात केली आहे, अशी माहिती डॉ. इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!