दिलासादायक:कोरोनाची तिसरी लाट उतरणीच्या दिशेने…राज्यात कोरोना रूग्ण संख्येत एका दिवसात तब्बल १० हजाराने घट..

मुंबई- राज्यात कोरोना रूग्णसंख्येत आज दिलासादायक घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.आज राज्यात राज्यात ३१,१११ नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या तुलनेत आज जवळपास तब्बल १० हजाराने घट झाली आहे.तर आज २९,०९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण ६८,२९,९९२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण९४.३% एवढे झाले आहे.तसंच आज राज्यात १२२ ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत.
मुंबईतील कोरोना परिस्थिती
मुंबईच्या कोरोना रूग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.तब्बल दोन हजारांनी रूग्णसंख्या घटल्याचं मुंबईत पाहायला मिळत आहे. आज ५ हजार ५५६ नवे रुग्ण आढळले असून १२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १६ हजार ४६९ झाली आहे. तर १५ हजार ५५१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे आतापर्यंत ९ लाख ३५ हजार ९३४ मुंबईकरांनी कोरोनावर मात झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून ९३ टक्क्यांवर पोहचला आहे.