महाराष्ट्रमुंबई
मुंबईतीलओशिवरा मार्केटमध्ये लागलेल्या आगीने उध्वस्त केली १० ते १२ दुकाने!

मुंबई: अंधेरीतील ओशिवरा एसवी रोडवरील फर्निचर मार्केटमध्ये मोठी आग लागली. या आगीत 150 पेक्षा जास्त दुकाने जळून खाक झाली. सकाळी साडे अकराच्या सुमारास ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.स्थानिक नागरिकांमध्ये या आगीमुळे घबराट निर्माण झाली.
अंधेरी पश्चिमेतील असलेल्या ओशिवरा येथे एक मोठं फर्निचर मार्केट आहे. येथे फर्निचरची मोठ मोठी दुकानं आणि लाकडी गोडाऊन देखील आहे. या फर्निचर मार्केटमध्ये ही आग लागली होती. लाकडांची गोडाऊन आणि फर्निचरचं सामान असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात आणि वेगाने पसरली.