मुंबईमहाराष्ट्रराष्ट्रीय

अजित पवारांना स्थानिक न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स

पुणे : बारामती तालुक्यात 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी मतदारांना धमकी दिली होती. त्यावरून आता पवारांना 16 डिसेंबरला स्थानिक न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. दरम्यान, आता 10 वर्षानंतर न्यायालयाने अजित पवारांना या प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
त्यावेळी गावातील लोकांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही, तर गावचे पाणी बंद करू, अशी थेट धमकी दिली होती. तसेच तुमचा पाणी प्रश्न दोन महिन्यांत सोडवतो, परंतु मतदान आम्हालाच करा, असे म्हटले होते. 2014 मध्ये लोकसभा निवडणूक आचारसंहिता काळात मतदार संघातील हे प्रकरण आहे. बारामती तालुक्यात मतदारांना अजित पवार यांनी धमकी दिली होती. त्यावेळी निवडणूक प्रचार संपल्यानंतरही मासाळवाडी या गावामध्ये अजित पवार गेले होते. अजित पवार यांनी 2014 च्या निवडणुकीत उमेदवाराला मत न दिल्यास गावाचे पाणी बंद करू, असं वक्तव्य केल्याने हे समन्स बजावल्याचं खोपडे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!