लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव नियोजनाची बैठक संपन्न

सिंधुदुर्ग- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव २४ फेब्रुवारीला होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आंगणेवाडी येथे काल यात्रा नियोजन बैठक पार पडली.
यात्रेकरू भाविकांना सुलभ दर्शन मिळावे या दृष्टीने नियोजन करताना कोरोना नियमावलीचे पालन योग्यपद्धतीने करावे, अशा सूचना सर्व विभागाच्या प्रशासन प्रमुखांना देताना यात्रा परिसराची पाहणी जिल्हाधिकारी यांच्यावतीने करण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. बर्गे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, पोलीस अधिकारी सचिन चव्हाण, सरपंच तसेच विविध खात्याचे प्रमुख यासह आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, प्रकाश आंगणे, अनंत आंगणे, दीपक आंगणे, नंदू आंगणे, रामदास आंगणे, सुधाकर आंगणे, रवी आंगणे आदी उपस्थित होते.