नवी दिल्ली

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा!

नवी दिल्ली : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. जगदीप धनखड यांची 2022 मध्ये उपराष्ट्रपती निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ हा 2026 पर्यंत होता. आगामी काळात ते देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या देखील शर्यतीत असल्याची चर्चा होती. पण त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आरोग्याच्या कारणांमुळे हा निर्णय घेतला. त्यांच्या राजीनाम्यामुळे आता उपराष्ट्रपती पदासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राज्यसभेचे सभापतीं होते. संसदेचं आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे तात्पुरते काम पाहतील. धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. आपण आरोग्य आणि डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे ते हे पद सोडत आहोत, असं धनखड यांनी म्हटलं आहे.
जगदीप धनखड यांनी घटनेच्या कलम 67 (a) नुसार, आपले पद सोडले आहे. “आरोग्याची काळजी घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला मानणे, यासाठी मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे,” असे त्यांनी सांगितले. धनखड म्हणाले की, भारताची आर्थिक प्रगती पाहून खूप आनंद झाला. या काळात देशाने खूप विकास केला, असेही ते म्हणाले. ‘देशाच्या इतिहासातील या महत्त्वाच्या काळात काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती, असे धनखड यांनी सांगितलं. जगदीप धनखड ऑगस्ट 2022 मध्ये उपराष्ट्रपती झाले होते. त्यांनी आता राजीनामा दिल्याने, हे पद रिक्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!