मुंबई

बच्चू कडूंची विधानसभेच्या १५ ते २० जागा लढण्याची कसरत

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकांसदर्भात राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती सरकारला पाठिंबा दिलेल्या बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी आपण मेल्यावरच शेतकरी हिताच्या मुद्द्यांबाबत आपली भूमिका बदलेल, असं ठामपणे त्यांनी सांगितलं.

याच मुद्द्यावर सरकारशी चर्चा करणार असून त्यावर सहमती न झाल्यास स्वतंत्र लढण्याचा इशाराच बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना दिला. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारला निर्णय घ्यावा लागेल, अशी ठाम भूमिका मांडली आहे. “शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सरकारची भूमिका पाहून आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आपण शेतकरी म्हणून विधानसभेत आलं पाहिजे. पण इथे सगळे आमदार पक्षाचे म्हणून येतात. आमचा १०-१५ आमदारांचा जर एखादा गट शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमी आक्रमक राहिला, तर त्यासंदर्भात चांगले निर्णय होऊ शकतात”, असं म्हणत बच्चू कडूंनी स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत.

बच्चू कडू सरकारवर नाखूश असल्याच्या चर्चा रंगत असून त्यावरही त्यांनी प्रतिक्करिया दिली. “नाखूश वगैरेचा विषय नाही. आम्ही मुद्द्यावरच लढू, चर्चा करू. शेतकरी, मजुरांच्या प्रश्नांवर आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. ते काय सकारात्मकता दाखवतायत ते बघू. जर त्यांच्या सरकारकडून हे नाही झालं तर किमान मी तरी १५-२० ठिकाणी उमेदवार उभे करून स्वतंत्र लढणार”, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!