सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी,ओमायक्राॅनमुळे कार्यालयातील हजेरीबाबत मोठा निर्णय!

मुंबई:- कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूने जगभर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.भारतातही ओमायक्रॉनने डोकेवर काढायला सुरुवात केली आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या ही वाढू लागली आहे.याच धर्तीवर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
केंद्राने उपसचिव दर्जापेक्षा वरच्या अधिकाऱ्यांना वगळून अन्य सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील प्रत्यक्ष उपस्थितीबाबत ५० टक्के चक्राकार पद्धतीने उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील काही दिवस घरी राहून तर काही दिवस ऑफिसला येऊन काम करावं लागणार आहे.
केवळ उपसचिव आणि त्यावरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच रोज कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे.मात्र, त्यातूनही दिव्यांग व्यक्ती आणि गरोदर महिला अधिकार्यांना वगळण्यात आले आहे. कार्यालयात एकाच वेळी गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी घेत विविध उपाययोजना देखील आखल्या जाणार आहे.
याचसोबत कार्यालयात उपस्थित राहत असताना कोरोना नियमांचे पालन करणे सर्व अधिकाऱ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. तसंच कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून वगळण्यात आले आहे.