राज्यात कोरोनासंख्या आटोक्यात,वाचा आजची संख्या

मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या २ हजार ७४८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या किंचीत वाढली असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात ५ हजार ८०६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तर दुसरीकडे राज्यात आज १११ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली.आतापर्यंत ४४५६ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी ३३३४ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात ११२२ ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
मुंबईची कोरोना परिस्थिती:-
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत २५५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ४३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट ९८ टक्के इतका झाला आहे.
तिसरी लाट सुरू झाल्यानंतर 2 जानेवारीनंतर काल पहिल्यांदा मुंबईत शून्य मृत्युची नोंद झाली होती. आज पुन्हा शून्य मृत्युची नोंद झालेली आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘कोविड’चा पहिला रुग्ण हा ‘मार्च २०२०’ मध्ये आढळून आला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा ‘शून्य’ मृत्यूची नोंद महानगरपालिका क्षेत्रात झाली होती. या नंतर ‘डिसेंबर २०२१’ मध्ये देखील ७ वेळा ‘शून्य’ मृत्यूंची नोंद झाली होती.