जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या आरोपीच्या प्रेमात पडली जज

अर्जेंटिना- जेलमध्ये एका कैद्याला किस करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या व्हिडीओचा तपास केल्यानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला जज त्याच पॅनलचा भाग आहे, ज्याने या आरोपीला शिक्षा सुनावली आहे. या जजने आरोपीला मिळालेल्या शिक्षेचा विरोध केला होता. ही घटना अर्जेंटिनाची आहे. यात हत्येच्या आरोपात तुरुंगात कैद असलेल्या क्रिस्टियन बस्टोस याच्यासोबत क्रिमिनल जज मारियल सुआरेजचा लिप-लॉक व्हिडिओ सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जजने ही एक अधिकृत भेट होती असं सांगितलं आणि कॅमेऱ्याच्या चुकीच्या अँगलमुळे हे दृश्य असं दिसल्याचा दावा केला आहे. जज मारियलने आरोपी क्रिस्टियन बस्टोसला जन्मठेपेची शिक्षा दिली जावू नये, असं मत मांडलं होतं. आता त्याच आरोपीसोबत जेलमधील किसिंग व्हिडिओ समोर आल्यानंतर मारियलचं असं म्हणणं आहे की ती क्रिस्टियनवर एक पुस्तक लिहित असून याचबद्दल बोलण्यासाठी ती तुरुंगात गेली होती. व्हिडिओ त्याच भेटीचा आहे. आरोपीसोबत रोमान्स करण्याबाबत मारियलाची चौकशी सुरू आहे.
सीसीटिव्हीमध्ये कैद व्हिडिओच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू आहे. यात जज मारियल कॅमेऱ्याकडे पाठ करून आरोपी क्रिस्टियलच्या जवळ जाताना दिसते. याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की आपलं बोलणं कोणाला समजू नये यासाठी त्या बोलताना आरोपीच्या इतकं जवळ गेल्या होत्या. क्रिस्टियन बस्टोस आपल्या मुलाच्या आणि एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येच्या प्रकरणात तुरुंगात आहे.