प.महाराष्ट्रकोंकणमहाराष्ट्रमुंबईराजकीयराष्ट्रीय

माजी मंत्री नारायण राणेंच्या या खरमरीत टीकेवर आदित्य ठाकरे यांचा पलटवार

सिंधुदूर्ग : राज्यात निवडणूक वारे जोरात वाहत आहेत. मतदानाची तारीख जवळ येताचा शाब्दीक आक्रमनाची गती नेते मंडळीकडून वेगवान पद्धतीने होत आहे. राज्यात शुक्रवारी निलेश राणे यांच्या प्रचारासाठी कुडाळमध्ये निवडणुक प्रचार सभेचे नियोजन करण्यात आले होते.  यावेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे हे हिंदूत्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना गोळया घातल्या असत्या, असे वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. यावेळी नारायण राणे यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, नारायण राणेंच्या या खरमरीत टीकेला माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे असे घाणेरडे विचार अशाच घाणेरड्या व्यक्तींना ये शकतात.

मात्र हा प्रकार निंदनीय आहे. उघडपणे उध्दव साहेबांना धमकी देणे यातून त्यांचा हेतू आणि मनात विष आहे हे त्यांनी दाखबून दिले आहे. त्यांचा खरा चेहरा समोर आलाय. या घाणीवर आ्ही कधी बोलत नाहीं. पण गेले वीस वर्षे यांना पगार मिळायचा आमच्यावर टीका करायला, आम्हाला शिव्या द्यायला. उध्दव साहेबांना गोळ्या घालू हे बोलणे निंदनीय आहे. एका जबाबदार नेत्याने असे बेजबाबदारपणे बोलावे? एवढे घाणेरडे वक्तव्य आम्ही कधी ऐकले नाहीं. हा भाजपचा खरा चेहरा आहे. अशी घणाघाती टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!