ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

प्रचारात ‘देवा भाऊ’चा सूरमयी डंका…

मुंबई- विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी ‘देवा भाऊ देवा भाऊ’ गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत प्रचारात आघाडी घेतली आहे. या गाण्यातून देवेंद्र फडणवीसांचे ब्रॅडिंग करण्याबरोबरच महायुतीच्या अनेक कामांचं श्रेय पदरात पाडून घेण्याचाही हेतू आहे.

देवा भाऊचं गणित काय?

महायुती सरकारची लाडकी बहीण योजना राज्यभरात प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. योजनेच्या श्रेयासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने जाहिरातबाजी करत आहेत.आता बहिणींचा भाऊ ‘देवा भाऊ’ या गाण्यामार्फत भाजपाकडूनही महायुती सरकारच्या कार्याची जाहिरात केली जात आहे. लोकांपर्यंत ही कामे पोहोचवण्यासाठी देवा भाऊ हा सूरमयी ताल निवडण्यात आला आहे.

गाण्यातून फडणवीसांचे आणि सरकारचेही ब्रँडिंग

फडणवीसांचं लक्ष्य नेमकं काय हे सांगताना या गाण्यात दिवसरात्र, एकच लक्ष्य, एकच ध्यास, देश हाच धर्मप्राण आणि श्वास ज्याचा असे प्रेरणादायी बोल आहेत. तसेच, फडणवीसांनी 2014 ते 2019 या पाच वर्षांत आणि 2022 मध्ये सत्तेत आल्यानंतर काय कामे केली यावर प्रकाश टाकला आहे. मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबईतील विस्तारलेल्या मेट्रोसह फडणवीसांनी राज्याच्या जनतेसाठी काय काय योजना राबविल्या आहेत, यावर भर दिला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!