मुंबई
मुंबईची जुनी ओळख असलेली डबल डेकर बस आता दिमाखात धावणार AC होऊन…

मुंबई:- मुंबईचा सुवर्णकाळ पाहणारी मुंबईची डबल डेकर बेस्ट बस पुन्हा परतणार आहे.या बाबतची माहिती बेस्टनेच दिली आहे.पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट हा उपक्रम राबवणार आहे आणि विशेष म्हणून बेस्ट AC डबल डेकर बस रस्त्यावर उतरवणार आहे.
‘बेस्ट’ प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर व्हावा आणि प्रवासी वाहून नेण्याची क्षमताही वाढावी यासाठी ‘बेस्ट’ची जुनी ओळख असलेली डबलडेकर बस नव्या अवतारात मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहे.
लंडनच्या धर्तीवर मुंबईत ९०० दुमजली वातानुकूलित बसगाडय़ा प्रवाशांच्या सेवेत आणण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. संपूर्णपणे विजेवर धावणाऱ्या या बसगाडय़ांमुळे मुंबईकरांना सुलभ, जलद आणि किफायतशीर प्रवास करता येणार आहे.