मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह फरार घोषित

मुंबई:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले आहे. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले आहे.परमबीर सिंह यांच्याबरोबरच रियाज भाटी आणि विनय सिंह यांनाही फरार घोषित करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाचे न्यायाधीश भाजीपाले यांनी हा निर्णय दिला.
परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांना 30 दिवसांची मुदत दिली जाणार आहे. या 30 दिवसात परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.