कोंकण
आंबा, काजूसाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणात फुलतोय कॉफीचा मळा

दापोली – कर्नाटक, आसामधील कॉफीचा मळा आंबा, काजूसह नारळ, पोफळीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणातही फुलू शकतो, हे दापोली तालुक्यातील केळशीचे शेतकरी उदय जोशी यांनी दाखवून दिले. २० गुंठे जमिनीवर आंतरपीक म्हणून रोबस्टा जातीच्या झाडांची लागवड त्यांनी केली.
त्याच्या फळापासून चांगल्या दर्जाची कॉफी बनवली जाते. गेली चार वर्षे ते कॉफीची फळप्रक्रिया करत असून त्यातून दरवर्षी चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न घेतात.स्ट्रॉबेरीच्या यशस्वी प्रयोगानंतर आता कोकणात कॉफीच्या लागवडीला चालना देण्याचा पर्याय पुढे येवू लागला आहे.
दापोली तालुक्यातील केळशी येथील उदय जोशी यांनी २०१५ साली कर्नाटक येथून कॉफीची फळे देणार्या रोबस्ट या जातीच्या बिया आणल्या. नारळ, पोफळीच्या बागेत आंतरपीक म्हणून त्यांनी लागवड केली. आणि अखेर त्यांचा प्रयोग यशस्वी झाला.