गोरेगाव पांडुरंगवाडीतील बंद पडलेल्या पोलिस बीट चौकीचे सीएसआर मधून नूतनीकरण!
रहिवाश्यांनी मानले अंकित प्रभू यांचे आभार

मुंबई : पांडुरंग वाडीतील रहिवाशांनी परिसरातील पोलीस चौकी गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याने पुन्हा सुरू करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना कार्यकारणी सदस्य श्री अंकित प्रभू यांच्याकडे केली होती. आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वात विधानसभा संघटक प्रवीण माईनकर, उपविभाग प्रमुख सुधाकर देसाई,शाखाप्रमुख अजित भोगले, पांडुरंग वाडीतील रहिवासी अजित सावे, विवेक समेळ, उदय मदिमन, नंदन शिरालीकर, वसंत पांदिकर, डॉ.अनिल तेंडोलकर, अरुण तेलंग, दीपक पटेल, प्रकाश पै, रघु कोप्पीकर, किशोर देशपांडे, सजीद चांदणे, शिला देसाई, हरीश व्यास, संजय शानबाग, सुधीर देवरुखकर, विशाल भट्ट, अनिल हजारें, शरद सावंत, सुभाष झरापकर इत्यादी नागरिकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वनराई पोलिस ठाणे माने यांची भेट घेतली व लेखी निवेदन दिले. सध्याचे कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वनराई पोलिस ठाणे बने यांनी अर्जाची दखल घेत लवकरच पोलीस चौकी चालू करण्याचे आश्वासन दिले.