वैद्यकीय

सेलिब्रेशननंतरचा हॅंगओव्हर कसा दूर कराल? जाणून घ्या काही सोपे उपाय

जगभरात नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं जातं. यासाठी अनेकजण आपल्या प्रियजनांसोबत सेलिब्रेशन देखील करतात. मोठ्या पार्टी होतात. पब, डिस्को, हॉटेल इथं जाऊन सेलिब्रेशन केलं जातं. या पार्टीदरम्यान सॉफ्ट ड्रिंक्ससोबतच डार्ड ड्रिंक्स अर्थात दारूचं सेवन करणंही काही जण पसंत करतात. मात्र मर्यादेपेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचा त्रासही होतो. यालाच हॅंगओव्हर म्हणतात. हा हॅंगओव्हर कसा दूर करावा, यासाठी काही खास टिप्स-

१.गूळ
हॅंगओव्हर दूर करण्यासाठी गुळाचा वापरही केला जाऊ शकतो. गूळ हा घटकही आपल्याला घरात सहज उपलब्ध होऊ शकतो. गुळात तीळ आणि आलं मिसळून त्याची पेस्ट तयार करा. सकाळी उठल्याबरोबर ही पेस्ट खाल्ल्यास हॅंगओव्हरमुळे दुखणारं डोकं शांत व्हायला मदत होईल.

२.लिंबूपाणी
लिंबूपाणी पिल्यानं हॅंगओव्हरनक्कीच दूर होतो. हा सर्वात सोपा उपाय आहे. लिंबू सर्वांच्याच घरात सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे. हॅंगओव्हरदूर करण्यासाठी सर्वप्रथम एक ग्लास पाणी घ्या. त्यात साधारण एक ते दोन चमचा लिंबाचा रस टाका आणि गरज असल्यास थोडं मीठ आणि साखरही टाका. हे मिश्रण सकाळी उठल्याबरोबर प्या, जेणेकरून तुमचा हॅंगओव्हर लवकर दूर होईल.

३.सायट्रिक अॅसिड असलेली फळं खाणं
हॅंगओव्हर दूर करण्यासाठी सायट्रिक अॅसिड अतिशय परिणामकारक आहे. त्यामुळे याचा समावेश असलेली संत्री, नाशपती, पेरू, अननस अशी फळं सकाळी उठल्याबरोबर नाश्त्यासोबत खाल्ल्यास हॅंगओव्हर दूर व्हायला मदत होईल. या फळांचा रस पिणंही परिणामकारक ठरू शकतं.

४.आलं
हॅंगओव्हर दूर करण्यासाठी आलं फार उपयुक्त घटक मानला जातो. याचा वापर करण्यासाठी आधी आलं थोडंसं भाजून घ्या आणि त्यानंतर चहामध्ये टाकून हा चहा सकाळी उठल्यावर प्या. जेणेकरून तुमचं डोकं दुखणं त्याचसोबत हॅंगओव्हर दूर होण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!