मुंबईकरांना बेस्टचं तिकीट ऑनलाईन काढता येणार

मुंबई:- मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली बेस्ट आता स्मार्ट होणार आहे. लवकरच बेस्टचा प्रवास सुखकर करण्यासाठी बेस्ट मार्फत ‘चलो’ हा ॲप प्रवाशांच्या भेटीला येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून आपल्याला हवी असलेली बस, आता कुठे आहे? आणि ती आपल्या स्टॉपपर्यंत किती वेळात पोहचणार आहे? याची सर्व माहिती या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना मिळणार आहे.
या ॲप्स् अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या ॲपच्या माध्यमातून बेस्टच्या प्रवाशांना ऑनलाईन तिकीट देखील मोबाईलवरून काढता येणार आहे.तसंच आपल्यापासून कोण-कोणते बसस्टॉप जवळ आहेत याची देखील माहिती या अँपच्या माध्यमातून प्रवाश्यांना मिळणार आहे.
तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी ही बस तुम्हाला किती वेळात पोहचवले,याची देखील माहिती हा अँप प्रवाश्यांना देणार आहे.बऱ्याचदा बेस्ट बसेसवर असलेल्या नंबरमुळे मुंबईत नवी असलेल्या प्रवाश्यांचा गोंधळ होतो.अश्या प्रवाश्यांना हा अँप महत्वाचा ठरू शकतो.