महाराष्ट्रमनोरंजनमुंबई

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मनोरंजनाचा डबल धमाका

बहुप्रतीक्षित ‘सिंघम अगेन’ सोबत झळकणार जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावेंच्या “संगीत मानापमान” चित्रपटाचा टिझर

जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा भव्यादिव्य चित्रपट “संगीत मानापमान” १० जानेवारी २०२५ ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एक अद्वितीय अनुभूती देणारा संगीतमय सिनेमा असणार आहे त्यामुळे या चित्रपटातील संगीताच्या मेजवानी ची एक छोटीशी झलक आपल्याला टिझर मध्ये बघायला मिळेल.

अभिनेते सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी ही त्रयी त्यांच्या मराठमोळ्या विलोभनीय अंदाजात मोठ्या पद्यवार प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाली आहे. आज दिवाळी च्या शुभदिनी निर्मात्यांनी चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि विशेष म्हणजे हा टिझर प्रेक्षकांना रोहित शेट्टीच्या मोस्ट अवेटेड मल्टी स्टारर चित्रपटा सोबत म्हणजेच “सिंघम अगेन” सोबत १ नोव्हेंबरला सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. रोहित शेट्टी आणि सिंघम चे बरेच चाहते आहेत त्यामुळे सिनेमाघरांमध्ये आलेल्या प्रेक्षकांसाठी हा एन्टरटेन्मेंट चा डबल डोस नक्कीच म्हणता येईल.

“संगीत मानापमान” या चित्रपटाच्या टिझरची सुरुवातच मधुर संगीताने होते. प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत या सिनेमाला लाभलं आहे. केवळ संगीत नव्हे तर पारंपरिक नृत्य, तलवारबाजी आणि मोठाले सेट, विलोभनीय दृष्य अशा बऱ्याच गोष्टी टिझर मध्ये आहेत, जे हे खात्री पटवून देतात कि नक्कीच हा चित्रपट नवीन वर्ष गाजवणार आहे.

या चित्रपटात एकूण १४ गाणी आहेत, तर ह्या गाण्यांना १६ दिग्गज गायकांनी आपला आवाज दिला आहे. इतकच नव्हे तर त्यातले ७ गायक हे नॅशनल अवॉर्ड विनर गायक आहेत. त्यामुळे चित्रपट पाहण्याचा अनुभव म्हणजे अद्वितीय गायकांनी सजवलेली मैफिल आहे. अभिनेते सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी सोबतच या चित्रपटात उपेंद्र लिमये आणि आणखी प्रसिद्ध कलाकार दिसणार आहे त्यामुळे नक्कीच चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.

अभिनेते सुबोध भावे यांनी चित्रपटा विषयी आपलं मत व्यक्त करताना सांगितले कि ” मला आनंद होतोय की आज रोहित शेट्टी दिग्दर्शित “सिंघम अगेन” सारख्या चित्रपटा सोबत मराठी परंपरेचा साज राखणारा आणि सुरेल संगीताचा मान ठेवणारा “संगीत मानापमान” चित्रपटाचा टिझर मोठ्या पद्यावर झळकणार आहे. केवळ मराठी माणूस नव्हे तर महाराष्ट्रात राहणारे इतर तमाम प्रेक्षक आणि विशेषतः सिनेमा लव्हर्स जे सिनेमागृहात जातील त्यांच्यासाठी नक्कीच मोठ्या पडद्यावर हा टिझर बघणं एक वेगळाच अनुभव असेल. ह्या तमाम प्रेक्षकांपर्यंत टिझर पोहचवण्यासाठी मी जिओ स्टुडिओज चे मनःपूर्वक आभार मानतो. हा सिनेमा नक्कीच एक मनोरंजनाची संगीतमय अविस्मरणीय भेट ठरणार आहे त्यामुळे मी खूप जास्त उत्सुक आहे कि संपूर्ण महाराष्ट्र आमच्या ह्या लार्जर दॅन लाईफ सिनेमाचा आस्वाद घेणार आहे आणि मी प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यास खूप उत्सूक आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, निर्माती ज्योती देशपांडे, श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, “संगीत मानापमान” चित्रपट १० जानेवारी २०२५ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज् आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!