जगणं ‘इगो’ नाही, तर ‘इको फ्रेंडली’ असा व शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेवून महिलांना स्वयंपूर्ण करा- जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते

रत्नागिरी :- मानवी जीवनाची सुरुवात बीजांमधून सुरु होऊन, ती ब्रम्हांडाच्या अंतर्लात विलीन होते. मानवाचे जगणे हे ‘इगो’ फ्रेंडली नसावे, तर ते ‘इको’ फ्रेंडली असावे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करून देत आहेत. शासनाच्या या योजनांचा फायदा घेऊन चक्रभेदी सोशल फाउंडेशनने महिलांसाठी रोजगार निर्माण करावेत, त्यांना स्वयंपूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.
साडवली येथे चक्रभेदी सोशल फाउंडेशनने विधवा महिलांसाठी सुरु केलेल्या ‘मायेचे हक्काचे घर’ निवारा केंद्राचे उद्घाटन आज करण्यात आले. ग्रामसंगी विकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, नेहा माने, माजी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, फाउंडेशनच्या अध्यक्ष वैदेही सावंत, निलेश चव्हाण आदी उपस्थित होते.
अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, प्रथा, अंधश्रद्धा यासारख्या चक्रांना भेदत चक्रभेदीने महिलांसाठी व पर्यावरणावर काम सुरु केले आहे. निराधारा महिलांसाठी मायेचं हक्काचं घर निवारा केंद्र करून काम सर्वोत्तम मानवी मूल्य जपण्यचे संवेदनशील काम केले आहे. हे प्रेरणादायी आणि आदर्श असे आहे. कोकोणणात रोजगाराच्या खूप संधी आहेत. शासन नवीन नवीन योजना राबवित आहे. आपण त्या योजनांची माहिती घेऊन रोजगार सुरु केले पाहिजेत.
कालच पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून बांबू परिषद झाली. प्रत्येक तालुक्यासाठी बांबू लागवड नोंदणी केंद्राच्या माध्यमातून मिशन मोडवर बांबू उत्पादनाचे काम सुरु होणार आहे. शासनामार्फत बांबू लागवडसाठी शेतकऱ्याला सात लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. बांबूपासून विविध वस्तूदेखील महिला बनवू शकतात. अशा अनेक योजनांचा लाभ घ्यावा. त्यातून रोजगारनिर्मिती करून स्वयंपूर्ण व्हावे, असेही सातपुते म्हणाले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल तसेच फाउंडेशनला लागेल ती मदत केली जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. वय वाढत गेली की वयोवृद्ध व्यक्तींना मानसिक आधाराची गरज असते, ती गरज हे निवारा केंद्र पूर्ण करेल, असे माने म्हणाल्या.
निवारा केंद्रांमुळे निराधारांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होणार आहे. भविष्यात विधवा हा शब्दच त्यांच्या समस्या विस्मृतर आहे असे शिंदे म्हणाले. फाउंडेशनला कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास ती केली जाईल, असे माजी नगराध्यक्ष शेट्ये म्हणाल्या.
निवारा केंद्रासाठी रावसाहेब चौगुले यांनी स्वतःचे घर दिल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंत यांनी केले. तर सूत्रसंचालन युयुत्सु आते यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.