ब्रेकिंग : मु्ख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या निवासस्थानाजवळ चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन!
फी भरली नाही म्हणून इंग्लिश स्कूल शाळेतील मुलांचं ऑनलाइन शिक्षण बंद
मुंबई: देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ञ्य मंडळींकडून देण्यात आला आहे. गेले दोन वर्ष लहान मुलांचे प्रत्यक्ष शिक्षण बंद आहे. त्यामुळे ऑनलाईन शाळा सुरु आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासाजवळील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये 400 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण शाळेने बंद केले. त्याविरोधात आज सोमवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी ”उध्दव काका आमच्या शिक्षणाचं काय?” असे फलक झळकावले.
कोरोनामुळे पालकांच्या नोकऱ्या गेल्या काहींना कमी पगार मिळाला. त्यामुळेच पालकांना पूर्ण शुल्क फी भरता येत नाहीये. शुल्क फी न भरल्याने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुलांचं शिक्षण थांबवण्यात आलं. त्यामुळे विध्यार्थी आणि पालक आता रस्त्यावर उतरले आहेत.
न्यू इंग्लिश स्कुल पालक विद्यार्थी आंदोलन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निवासस्थानाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील तब्बल 400 मुलांचं ऑनलाइन शिक्षण बंद करण्यात आले आहे. शुल्क फी न भरल्यामुळे या मुलांना शिक्षण घेता येत नाहीये. त्यासाठी शाळेसोबत अनेक बैठका झाल्या होत्या. मात्र त्यातून तोडगा न निघाल्यामुळे अखेर विद्यार्थी आणि पालक शाळेच्या बाहेर जमून त्यांनी आंदोलनाचा केले. मात्र त्यांना शाळा प्रशानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.