मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाने स्वराज्याचे पहीले आरमार प्रमुख अपराजित योध्दा मायनाक भंडारी यांचे नाव सिंधुदुर्ग जिल्हयाच्या नियोजन सभागृहाला

सिंधुदुर्गमहाराष्ट्राचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्या प्रयत्नाने स्वराज्याचे पहीले आरमार प्रमुख अपराजित योध्दा मायनाक भंडारी यांचे नाव सिंधुदुर्ग जिल्हयाच्या नियोजन सभागृहाला देण्याचे ठरविले असून हा सोहळा देशाच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग ओरोस येथे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, मायनाक भंडारी हे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन सभागृहाला देणे म्हणजेच जिल्हयातील तमाम भंडारी ज्ञातीबांधवांसाठी अभिमानाची बाब आहे यासाठीच देवगड तालुक्यातील बहुसंख्य भंडारी ज्ञातीबांधव तालुक्यातील प्रत्येक गावा गावातून या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि याचे नियोजन करण्यासाठी देवगड तालुका भंडारी समाजाची मिटींग पार पाडली यावेळी बाळ खडपे, विलास रुमडे, आप्पा अनभवणे, वैभव करंगुटकर, सुधीर मांजरेकर, सुनिल बिर्जे, गोपाळ रुमडे, संजय बोंबडी, बाबू सावंत आदी उपस्थित होते