विदर्भ
नागपूरात विकली जातेय काळी इडली

दक्षिण भारतासह जगभरात प्रसिद्ध असलेली इडली हा संपूर्ण भारतीयांसाठी आवडता नास्ता झाला आहे. पण इडली हा शब्द उचारल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पांढरीशुभ्र आणि मऊ इडली येते.मात्र, काळी इडली तुम्ही कधी पाहिली आहे का? नाही ना? मात्र, आज आम्ही तुम्हाला काळी इडली दाखवणार आहोत.
https://www.instagram.com/reel/CXJPC3DgC4Q/?utm_source=ig_web_copy_link
नागपुरातील एका छोट्या हॉटेल चालकाने चक्क काळी इडली बनवली आहे.या इडलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.तसंच नेटकऱ्यांमध्ये ही इडली चर्चेचा विषय बनली आहे.या इडलीला ब्लॅक डिटॉक्स इडली म्हणतात.ही इडली खाण्यासाठी लांब-लांबून लोकं या हॉटेलमध्ये येतायेत.
फूड ब्लॉगर विवेक आणि आयशा यांनी या इडलीचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केलाय.हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहे.