भारतीय लष्कराने पाडलं पाकिस्तानचं ड्रोन

पंजाब:- पंजाबच्या सीमेवरून एक महत्वाची बातमी समोर आली आहे.बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानचं ड्रोन पाडलं आहे.धक्कादायक बाब म्हणजे हे ड्रोन ‘मेड इन चायना’ असल्याची माहिती समोर आली आहे.हे ड्रोन पाकिस्तानच्या फिरोजपुर सेक्टरमधून भारतात आल्याची माहिती भारतीय सेनेनं दिली आहे.
पाकिस्तान सातत्याने सीमा रेषेजवळ काही ना काहीतरी खुरापत करत असतो.कधी ड्रोनच्या माध्यमातून तर कधी आतंकवादयांच्या माध्यमातून पाकिस्तान भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो.अश्यातच आता पाकिस्तानच्या ड्रोनने भारतीय हद्दीत प्रवेश केल्याने भारतीय सेना सतर्क झाली आहे. भारतीय सेनेनं क्षणाचाही विलंब न करता हे ड्रोन पाडलं आहे.
पंजाबमध्ये ड्रोन पाडल्याची ही पहिलीच घटना आहे.या ड्रोनने हेरॉईन किंवा शस्त्रांची एखादी खेप भारतीय हद्दीत फेकून दिली असावी असा संशय भारतीय सैन्याला आहे.ड्रोन ताब्यात घेतल्यानंतर परिसरात लष्करामार्फत शोध मोहीम सुरू केली गेली आहे.