महाराष्ट्रमुंबई

दिग्गज बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू लवकरच चढणार बोहल्यावर

मुंबई : भारताचं नाव उज्ज्वल करणारी स्टार खेळाडू, बॅटमिंटनपटून पी.व्ही.सिंधू आता आयुष्याचा एका नवा अध्याय सुरू करणार आहे.तिचे लग्न याच डिसेंबर महिन्यात होणार आहे. हैदराबादमधील एक बिझनेस एक्झिक्युटिव्हशी ती लग्नगाठ बांधणार आहे. पी.व्ही सिंधूच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखत होते मात्र लग्न एक महिन्यापूर्वी ठरले होते. ही लग्नाची चांगली वेळ आहे, कारण जानेवारीपासून सिंधूचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू हिच्याबद्दल एक मोठी अपडेट आली आहे. देशाचं नाव उज्वल करणारी सिंधू लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. २९ वर्षांची सिंधू आता लवकरच लग्न करणार आहे. ती २२ डिसेंबर २०२४ रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे.तिच्या वडिलांनी सोमवारी, २ डिसेंबरला सिंधूच्या लग्नाची बातमी चाहते आणि मीडियासोबत शेअर केली आहे.

पीव्ही सिंधू ही भारतातील सर्वात दिग्गज बॅडमिंटनपटूंपैकी एक मानली जाते, तिने २०१९ मध्ये सुवर्ण पदकांसह जागतिक स्पर्धेत पाच पदके जिंकली आहेत. याशिवाय तिने ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदके जिंकले आहेत. तिने रिओ २०१६ आणि टोकियो २०२० मध्ये सलग ऑलिम्पिक पदके जिंकली होती. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू आहे. त्यांच्याशिवाय मनू भाकर, सुशील कुमार आणि नीरज चोप्रा यांनी ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत. सिंधूने २०१७ मध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले होते. दोन्ही कुटुंबीयांनी २२ डिसेंबरला लग्नसोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. २० डिसेंबरपासून लग्नाशी संबंधित कार्यक्रम सुरू होतील. २४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. पुढील स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असल्याने ती लवकरच तिच्या ट्रेनिंगला सुरूवात करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!