ब्रेकिंग:राज्यात सोमवार दि.७ जून पासून अनलॉक ची अंमलबजावणी
नवीन ५ टप्प्यातील मार्गदर्शक सूचना जारी..
मुंबई दि.५ : राज्यातील झपाट्याने कमी होणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने अनलॉक ची प्रक्रिया सुरु करण्याबाबत पावले उचलली असून संपूर्ण राज्यात एकाच वेळी निर्बंध उठविण्या ऐवजी, जिल्ह्या जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी ची सरासरी तसेच ऑक्सिजन बेड भरण्याचे प्रमाण या दोन निकषांवर एकूण ५ टप्प्यात निर्बंध उठविण्यात येणार आहेत.
नवीन मार्गदर्शक सूचना काल रात्री उशिरा जारी करण्यात आल्या असून या नियमावली ची अंमलबजावणी सोमवार दि.७ जून पासून सुरु करण्यात येणार आहे.
काय आहेत पाच टप्पे ?
पहिल्या टप्प्यात काय सुरु होणार?
रेस्टॉरंट्स, मॉल्स
मैदानं, वॉकिंग ट्रॅक्स
खासगी आणि सरकारी कार्यालयं 100 टक्के सुरु
सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्यांना परवानगी
जीम, सलून
आंतरजिल्हा प्रवास
ई-कॉमर्स सुविधा
दुसऱ्या टप्प्यात काय सुरु होणार?
५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट्स
५० टक्के क्षमतेने म़ॉल्स, थिएटर्स
सार्वजनिक जागा, मैदानं वॉकिंग ट्रॅक पूर्णपणे सुरु
बांधकामं, कृषीविषयक कामं पूर्णपणे सुरु
जीम, सलून ५० टक्के क्षमतेने सुरु
बसेस पूर्ण क्षमतेने सुरु
जिल्ह्याबाहेर जायला परवानगी, मात्र पाचव्या टप्प्यातल्या जिल्ह्यात जायचं असेल तर पास काढावा लागणार.
तिसऱ्या टप्प्यात काय सुरु होणार ?
अत्यावश्यक सेवेतली दुकानं सकाळी ७ ते २
इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ (शनिवार, रविवार बंद)
चौथ्या टप्प्यात काय सुरु होणार ?
फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने ४ वाजेपर्यंत सुरु राहणार. संध्याकाळी ५ वाजेनंतर सर्व प्रकारच्या हालचालींवर निर्बंध
पाचव्या टप्प्यात काय सुरु होणार ?
फक्त वैद्यकीय आणीबाणी सोडून संपूर्ण संचार बंदी
अत्यावश्यक सेवेतील दुकाने फक्त ४ वाजेपर्यंत सुरु व शनिवार रविवार संपूर्ण बंद
शासकीय अध्यादेश
Unlock guidelines 4th jun 2021