मुंबई आदिवासी काँग्रेस तर्फे भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन

मुंबई:- मुंबई विभागीय आदिवासी काँग्रेसच्या वतीने मुंबईतील आदिवासी समाजाचा भव्य आदिवासी मेळावा रविवार दि.९ जानेवारी २०२२ रोजी गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.हा मेळावा गोरेगाव येथील छोटा काश्मीर मैदान,आरे कॉलनी येथे पार पडणार आहे.
या आदिवासी मेळाव्यात आदिवासी पारंपरिक नृत्य,मुंबई स्थित आदिवासी समाजाचे प्रश्न, तसेच उपस्थित दिग्गज मान्यवरांकडून मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे.या आदिवासी मेळाव्याचे आयोजन मुंबई आदिवासी काँग्रेस अध्यक्ष सुनिल बिसन कुमरे यांनी केले आहे.
या आदिवासी मेळाव्याला, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप,अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस अध्यक्ष बलिया नाईक, तसेच दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख,शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांसह मुंबईतील काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.