प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे निमित्ताने राज्यभरात राबविले जाणार ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ, विकसित भारताचा ठरणार आधार

मुंबई : महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणिदेशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’हे विशेषराष्ट्रीय अभियानदि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर२०२५दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभइंदौर, मध्य प्रदेशयेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्तेहोणार असूनया कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरातील प्रमुख ठिकाणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातीलराज्यस्तरीय शुभारंभ सोहळा दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यभर होणार असून राज्यस्तरीयकार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर, रंगस्वर सभागृह नरिमन पॉईंटयेथे मा. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, राज्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलाआहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ तसेच इतर विभागाचे मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी दृकश्राव्य प्रणालीद्वारे या अभियानामध्ये सहभागी होणार आहेत. राज्यभरात त्याच दिवशी प्रत्येक जिल्हा व महापालिका स्तरावर महिला व बालकांसाठीविशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.