ब्रेकिंगमनोरंजनमहाराष्ट्रसाहित्यिक

नाट्य परीषद निवडणुकीत उदय सामंत यांनी पाठिंबा दिलेल्या “रंगकर्मी पॅनल”  चा मोठा विजय…

मुंबई,दि.17 (महेश पावसकर) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या  निवडणूकीत दिग्दर्शक प्रसाद कांबळी यांच्या “आपलं पॅनल” चा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या “रंगकर्मी पॅनल” ने सुपडा साफ करत मोठा विजय मिळवलांय.

मुंबईत १४ पैकी १० जागांवर मंत्री उदय सामंत यांनी पाठिंबा दिलेलं “रंगकर्मी पॅनल”विजयी झालंय. तर उर्वरित महाराष्ट्रात ५० पैकी ४५ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पाठिंबा दिलेले उमेदवार विजयी. याच निवडणुकीत भाजपच्या काही पदाधिकऱ्यांकडून पॅनल उभं करण्यात आल होतं परंतु त्यांना अपेक्षित विजय मिळवता आला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नाट्य परीषदेत उद्योग मंत्री उदय सामंत यांचा दबदबा दिसुन आलांय..

या निवडणुकीत मुंबई मध्यवर्ती शाखेतील दहा जागांपैकी ८ जागांवर दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरीत दोन जागांवर प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले. मुंबई मध्यवर्तीत शाखेत एकूण १,३२८ जणांनी मतदान केलं. त्यात माटुंगा इथल्या यशवंत नाट्य मंदिरात १,२४५ तर गिरगांव इथं ८३ जणांनी मतदान केलं. मुंबई उपनगर शाखा (मुलुंड – बोरिवली- वसई) इथं एकूण ७३० जणांनी मतदान झाले.

‘रंगकर्मी नाटक समूहा’कडून प्रशांत दामले (७५९), विजय केंकरे (७०५), विजय गोखले (६६४), सयाजी शिंदे (६३४), सुशांत शेलार (६२३), अजित भुरे (६२१) , सविता मालपेकर (५९१), वैजयंती आपटे(५९०) भरघोस मतांनी विजयी झाले. तर आपलं पॅनल मधून प्रसाद कांबळी (५६५) आणि अभिनेत्री सुकन्या मोने (५६७) विजयी झाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!