राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण,अजित पवारांची माहिती

मुंबई- गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा खाली येणारा आलेख आता पुन्हा वर जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसते आहे. दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा विषाणूसह ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे.
अश्यातच काही दिवसांपूर्वी राज्यातील मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.यातच आता राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
यावेळी प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी,’जर यापुढेही राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत राहीली, तर राज्य सरकार आणखी कठोर निर्बंध घालू शकते’, असे संकेत दिले आहेत.
यांसह अन्य नेते कोरोनाबाधित-
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अन्य काही मंत्री कोरोना संक्रमित झाल्याची माहिती समोर येत आहे.