सरत्या वर्षाला हसत निरोप देऊन नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक करायची असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या

मुंबई:- महाराष्ट्राचं सौंदर्य पाहणं ही प्रत्येकासाठी पर्वणी असते.अश्यातच नाताळच्या सुट्या आणि त्याला जोडून आलेला विकेंड एन्जॉय करण्यासाठी आणि नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करण्यासाठी तुम्ही कुठे जाण्याचा प्लॅन आखत असाल तर या ठिकाणी नक्की भेटी द्या.
१.अलिबाग बीच:- आपल्या कोकणाला समृद्ध समुद्र किनारा लाभला आहे.या समुद्र किनाऱ्यावरील वाळूत सूर्यास्त अनुभवत आपल्या प्रियजनांसोबत तासनतास गप्पा मारत तुम्हाला त्यांना वेळ द्यायचा असेल तर अलिबागचा समुद्र किनारा तुमच्यासाठी ‘वन ऑफ द बेस्ट डेस्टिनेशन’ आहे.तसंच येथील पॅराग्लायडिंग आणि बीचवरील थरारक गेम तुम्ही येथे अनुभवू शकता.तसंच ऐतिहासिक मुरुड जंजिरा या किल्ल्यालाही भेट देऊ शकता.
२.महाबळेश्वर:- वीकेंड आणि नाताळच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी महाबळेश्वर हे पर्यटन स्थळही आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊ शकतं.सातारा जिल्ह्यातील या पर्यटन स्थळाला थंड हवेचं ठिकाण म्हणून जगभर ओळखलं जातं.स्ट्रॉबेरी,गुलाबी थंडी,आणि हवा-हवासा वाटणारा इथला निसर्ग तुम्ही इथे अनुभवू शकता.तसंच नविन वर्षाची प्रेरणादायी सुरुवात करायची असेल महाबळेश्वरपासून अगदीच काही अंतरावर असलेल्या ऐतिहासिक प्रतापगडाला देखील तुम्ही भेट देऊ शकता.
३.माथेरान:- माथेरान हे महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे.इथे तुम्हाला घोडेसवारी पासून निसर्ग भ्रमंती पर्यंत सर्वकाही अनुभवता येऊ शकतं.तसंच माथेरान एक्सप्रेस या टॉय ट्रेनच्या माध्यमातून तुम्हाला माथेरानचं सौंदर्य पाहता येऊ शकतं.मुंबईपासून काहीच अंतरावर हे ठिकाण आहे.कमी खर्चात तुम्ही या पर्यटन स्थळाला भेट देऊन आपला थकवा दूर करू शकता आणि नविन वर्षाची सकारात्मक सुरुवात करू शकता.
या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग येथील समुद्र किनारा,आक्षी,नागाव,किहीम,काशिद, मुरुड, दिवेआगार,हरिहरेश्वर, श्रीवर्धन या पर्यटन स्थळांना देखील भेट देऊ शकता.





