महापालिका निवडणुकांच्या कामाला लागा,राज ठाकरेंनी दिले पदाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई:- आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर आज मुंबईमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकांच्या कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.
मनसे आता पूर्ण ताकदीनिशी महापालिका निवडणुकांमध्ये उतरणार असून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान भाजप किंवा इतर पक्षांसोबतच्या युतीच्या चर्चांमध्ये न पडण्याचेही आवाहन राज ठाकरे यांनी आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.
मागील सर्व चुका लक्षात ठेवून मनसे आता नव्या दमाने निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे. आपले उमेदवार निवडून यावेत, त्यांचा योग्य प्रचार व्हावा यासाठी मनसे विशेष मेहनत घेणार आहे. हे सर्व विषय लक्षात घेऊन या संदर्भात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे.