सलमान खाननं उडवली अभिजित बिचुकलेची खिल्ली, म्हणाला…

मुंबई – नुकताच जगभरात ३१ डिसेंबरचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.आता संपूर्ण जग नवीन वर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा करत आहे. अश्यातच कलर्स टीव्हीच्या बिग बॉस १५ या शोमध्ये घरातले स्पर्धक घरात नवीन वर्ष साजरं करत होते. बिग बॉसच्या या सेलिब्रेशनमध्ये सलमान खाननं सर्वांसोबत नवीन वर्षाचं स्वागत केलं.
या एपिसोडमध्ये सलमान खाननं अभिजित बिचकुलेची खिल्ली उडवली आणि असं काही बोलला की त्यानंतर सगळे हसायला लागले. कलर्स टीव्हीच्या लेटेस्ट शोमध्ये संगीत उद्योगातले दोन तरुण आणि प्रसिद्ध चेहरे, जन्नत जुबेर आणि सिद्धार्थ निगम यांच्यासह टेलिव्हिजन इंडस्ट्रीतले अनेक नामांकित कलाकार उपस्थित होते. सलमाननं सगळ्यांसोबत धमाल केली.
या शोचा स्पर्धक अभिजित बिचकुले हा या शोचा हाऊसमेट आहे. तो सर्वाधिक चर्चेत असणारा स्पर्धक आहे. आपल्या विचित्र स्वभावानं आधीच त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या एपिसोडमध्ये पाहुण्यांशी बोलताना सलमाननं अनेकवेळा अभिजित बिचकुलेचा उल्लेख केला. अनेकवेळा सलमान अभिजितच्या नावाची खिल्लीही उडवताना दिसला.
दरम्यान सलमान खान सिद्धार्थ निगमच्या डान्सचं कौतुक करत होता.तसेच या स्तुतीदरम्यान सलमान खाननं अभिजितचा उल्लेख करत गंमतीनं म्हटलं, की “डान्सचा डी, म्युझिकचा मसुद्धा (बिचकुलेंकडे बघत) त्या सुकलेल्या नाना पाटेकरला येत नाही. यावर सगळेच हसले. सलमान खानने पहिल्यांदा हे केलं नाही. त्याने अनेकदा अभिजित बिचकुलेची खिल्ली उडवली आहे. मात्र अभिजितने यावर हसत या जोक्सचा आनंद घेतला.