
सिंधुदुर्गनगरी :आई जेवू घाली ना, बाप भीक मागू देईना या उक्तीप्रमाणे आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलन, उपोषणं एवढंच नव्हे तर मुंडनही केले तरी आजपर्यंत न्याय मिळाला नाही.कोकण विभागीय आयुक्त, आयुक्त समाजकल्याण पुणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालकमंत्री महोदय, आमदार खासदार यांचे कडे दाद मागूनही आजपर्यंत न्याय मिळाला नाही. अस आरोप बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी केला आहे.
रावजी यादव यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेले मुद्दे व आरोप
१) सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे औट घटकेच्या राज्यांकडून मागासवर्गीयांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले त्याबाबत आमचे पोलीस खाते आपल्या पोलिस कायद्याच्या चौकटीत स्वतःची खातरजमा कायदेशीर दृष्ट्या संविधानिक पद्धतीने कोणाच्या दबावाखाली का करत नाहीत.?
२) मलकापूर अॅटो रिक्षा संघटनेचा नोंदणी क्रमांक वापरुन * तुझी ती माझी* म्हणणा-या तथाकथित संघटनेला ज्यानी शासकीय इमारत शासकीय कामकाज सोडून दलाली, भाटगिरी, करणाऱ्या संघटनेला हॉटेल चालविण्यासाठी दिलेल्या इमारतीचे भाडे सन १९९८ सालापासून ७,५२,४००/- + आजपर्यंत होणारे व्याज वसूल करण्यासाठी आत्तापर्यंत कोकण विभागीय आयुक्त स्तरापासून, लोकल फंड, महालेखाकार, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कुडाळ, कणकवली तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी, आले किती गेले किती संपले भरारा ? दरवर्षी वार्षिक, आकस्मिक तपासणी, लेखापरीक्षणा च्या नावाखाली जनतेचा पैसा उधळला गेला, परंतु हा महसूल आज पर्यंत कुणीही वसूल का केला नाही ?
(३) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणविणारे अनुसूचित जाती ५९ पैकी फक्त महार, चांभार आणि नवबौद्ध समाजाचे मोठमोठे नेतेमंडळी असूनही या समाजासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने शासनाने प्रसिद्ध केलेल्या योजना, नाविन्यपूर्ण योजना प्रशासनाने, लोकशाहीच्या लोकप्रतिनिधी यांनी का राबवली नाही? याबाबत मुग गिळून गप्प का बसले ? ही योजना राबवायला कोण अपयशी ठरले? हे जनतेला कळण्याची गरज आहे.
(४) घेता येत नसतानाही विद्यमान जिल्हाधिकारी श्रीमती के मंजुलक्ष्मी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद असतांना हाफकिन संस्थेला नेब्युलायझर हिमोग्लोबिन मीटर मशिन उपकरणे खरेदी साठी जवळजवळ एक कोटी रुपये देऊन तीन वर्षे झाली तरी ती उपकरणे आजपर्यंत आली नाहीत त्यासाठी आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी ब्र शब्द का काढत नाहीत हे जनतेला कळण्याची गरज आहे. ती उपकरणे मिळावीत.
(५) जसे म्हणतात कुंकवाला आधार…….याप्रमाणे नाविन्यपूर्ण योजनेखाली सर्वसाधारण गटाच्या नावाने जवळपास १७ कोटी रुपये खाणारे कोण ? हे जनतेला आमच्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरुन का सांगत नाहीत ? असे सांगायला कोणी येतील त्यांना संपवायच्या कटकारस्थानात आमचे पोलीस खाते निर्भिड असूनही पाठीशी का घालते ? अशा शंका जनतेच्या मनामध्ये खदखदत आहेत, त्याचा स्फोट होऊ देऊ नका अशी माझी हात जोडून विनंती आहे , म्हणून मी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक अनुयायी म्हणून एक नागरिक आणि आमच्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पोलीस खात्याला भारतीय संविधानाच्या आधारे दिलेल्या अधिकारानुसार आपण मला दिलेल्या नोटीसीचा अनादर करणारच नाही. म्हणूनच दिनांक २६ जुलै २०२१ रोजी स्थगित केलेले उपोषण, आणि आजचे उपोषणं जे लाड पागे समितीच्या शिफारशींना डावलून शासन निर्णय बासनात गुंडाळून सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर सारख्या मनुवादी वृत्तीच्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुणे आयुक्त कार्यालय समाज कल्याण बंदुक चालवून केलेल्या अन्याया विरोधातील उपोषणं डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले तेव्हा त्यांच्या विरोधात चांभार समाजातीलच एक उमेदवार उभे राहिले त्याची आठवण आज जयंत चाचरकर यांनी करून दिली आहे. आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायद्याचे रक्षक आहोत म्हणूनच ही दोन्ही उपोषणं पोलिस खात्याने दिलेल्या नोटीसीतील भाषेनुसार सनदशीर मार्ग कोणता ? तो पोलिस खाते लेखी स्वरूपात सांगेल या आशेने, आणि तोपर्यंत स्थगित करीत आहे, जोपर्यंत येणारा भारतीय स्वातंत्र्यदिन उजाडत नाही तोपर्यंत, जर पोलिस खात्या कडून आम्हाला पोलिस खाते म्हणते तो सनदशीर मार्ग लेखी स्वरूपात दिला नाही तर येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हेच उपोषण करणार असल्याची माहिती रावजी यादव यांनी दिली.