संजय राऊत यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडून मी सादर केलेले पुरावे खोटे असल्याचं सांगावं. तसं झाल्यास मी जोड्याने मार खाईन -किरीट सोमय्या

नवी दिल्ली- संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोप केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमय्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे अलिबागमधील १९ बंगल्याचे कनेक्शन सोमय्यांनी बाहेर काढले होते.यासंबंधी त्यांनी आज पत्रकार परिषदेत ठाकरेंनी भरलेल्या मालमत्तेच्या पावत्या सादर केल्या.
दरम्यान, संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना बंगले दाखवण्याचं आव्हान केलं होतं. आणि ते न सापडल्यास जोड्याने मारणार असल्याची भाषा केली. यावर किरीट सोमय्यांनी थेट पायातील चप्पल काढून दाखवली. आणि मी केलेले दावे खोटे ठरवल्यास माझ्याच चप्पलीने मारा,असं ते म्हणाले.
माझ्या विरोधात तक्रार करायची असेल तर करा. रश्मी ठाकरे यांनी सदर ग्रामपंचायतीला माफीनाम्याचं पत्रंही लिहिलं आहे. जोड्याने किरीट सोमय्यांना मारणार असााल तर मारा, माझ्याच जोड्याने मारा. मी तयार आहे! असं ते म्हणाले. मी माझी चप्पल संजय राऊत यांच्या हातात द्यायला तयार आहे. फक्त राऊत यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडून मी सादर केलेले पुरावे खोटे असल्याचं सांगावं. तसं झाल्यास मी जोड्याने मार खाई, असं सोमय्या म्हणाले.