शिवसेना : कुरारमध्ये रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
मुंबई l शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिना निमित्ताने कुरारमध्ये रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवेसेना नेते, खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य प्रतोद, आमदार, विभाग प्रमुख, माजी महापौर मुंबई सुनिल प्रभु यांच्या संकल्पनेतून शिवसेना पक्षाचा स्थापना दिवस प्रतिवर्षी दिंडोशी विधानसभा क्षेत्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आखून दिल्या प्रमाणे वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील युवाराजे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे प्रदिप निकम, शिवसेना, व युवासेना दिंडोशी विधानसभा क्षेत्रच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदात्यांना आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सईबाई विद्यामंदिर येथे आयोजित रक्तदान शिबिराला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर म्युनिसिपल हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, नगरसेवक आत्माराम चाचे, नगरसेविका विनया विष्णू सावंत, विधानसभा संघटक विष्णू सावंत, प्रशांत कदम, रीना सुर्वे, उपविभाग प्रमुख प्रदिप निकम, उपविभाग संघटक वृंदा पालेकर, शाखा प्रमुख रमेश कळंबे, मोहन परब, शाखा संघटक विद्या खानविलकर, योगिता धुरी, शाखा समन्वयक मनोहर राहाटे, युवासेना मुंबई समन्वयक समृद्ध शिर्के, युवासेना उपविभाग अधिकारी निलेश सावंत, शाखा अधिकारी सिद्धेश रहाटे, शिवसेना कार्यालय प्रमुख, महिला व पुरुष उपशाखा प्रमुख, युवा उपशाखा अधिकारी महिला व पुरुष व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते