ब्रेकिंग

राज्य शासनाने मंत्र्यांच्या बंगल्यांना दिली गड किल्ल्यांची नावं; वाचा सविस्तर

मुंबई- राज्य सरकार सध्या मराठी अस्मितेला घेवून राज्यात काम करताना पाहायला मिळत आहे.बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक असल्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे मंत्रालयासमोर असलेल्या शासकीय बंगल्यांची नावं बदलण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत नंबरवरून ओळखले जाणारे हे बंगले आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत.

या बंगल्यांची नावं बदलून त्यांना गडकिल्ल्यांची नावं देण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमंत्र्यांसमोर मांडला होता.मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव मान्य केला असून यासंदर्भातील पुढील निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात येत असल्याचं कळंत आहे.या आदेशानुसार आता खालील बंगल्यांची नावं बदलण्यात आलेली आहे.

अ ३ – शिवगड (जितेंद्र आव्हाड)
अ ४ – राजगड (दादा भुसे)
अ ५ – प्रतापगड (केसी पाडवी)
अ ६ – रायगड (आदित्य ठाकरे)
अ ९ – लोहगड
बी १ – सिंहगड (विजय वड्डेटीवार)
बी २ – रत्नसिंधू (उदय सामंत)
बी ३ – जंजिरा (अमित देशमुख)
बी ४ – पावनगड (वर्षा गायकवाड)
बी ५ – विजयदुर्ग (हसन मुश्रीफ)
बी ६ – सिद्धगड (यशोमती ठाकूर)
बी ७ – पन्हाळगड (सुनील केदार)
क १ – सुवर्णगड (गुलाबराव पाटील)
क २ – ब्रह्मगिरी (संदीपान भुमरे)
क ३ – पुरंदर
क ४ – शिवालय
क ५ – अजिंक्यतारा (अनिल परब)
क ६ – प्रचितगड (बाळासाहेब पाटील)
क ७ – जयगड
क ८ – विशाळगड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!