अंकिता लोखंडेला विकी जैननं दिला मालदिव मधला व्हिला गिफ्ट,किंमत वाचून व्हाल थक्क!

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नुकताच विकी-कतरिनाचा शाही विवाह सोहळा पार पडला.यानंतर १४ डिसेंबरला अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन लग्न बंधनात अडकले. घरातल्या मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडल्यानंतर त्यांनी मित्रपरिवारासाठी रिसेप्शनचे आयोजन केलं होते.
या रिसेप्शनमध्ये विकी जैनने अंकिताला दिलेल्या महागड्या गिफ्टची चर्चा रंगली होती. विकी जैनने अंकिताला लग्नात भेट म्हणून चक्क मालदीवमध्ये एक व्हिला गिफ्ट केला आहे. या व्हिलाची किंमत तब्बल ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर अंकिताने देखील विकीसाठी एक प्रायव्हेट यॉट भेट म्हणून दिली आहे. या यॉटची किंमत ही ८ कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
अंकिता आणि विकीचा लग्न सोहळा जरी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला असला तरी अंकिता आणि विकीचं रिसेप्शन शाही पद्धतीने पार पडलं आहे.मात्र, हे लग्न मालदिव मधल्या व्हिलामुळे चर्चेत आलं आहे.