कासारवडवली ते गायमुख या मेट्रो 4 अ मार्गिका महत्वाची आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे कासारवडवली ते गायमुख या मेट्रो 4 अ प्रकल्पात 63.67 कोटींची वाढ झाल्याची कबुली मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे.आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे विविध माहिती विचारली होती. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने अनिल गलगली यांस सविस्तर माहिती दिली. सदर मे. जे.कुमार इंफ्राप्रोजेक्टस लि. यांस दिले असून अपेक्षित खर्च 440.84 कोटी होता ज्यात 63.67 /- कोटीची वाढ झाली आहे.
मे. जे.कुमार इंफ्राप्रोजेक्टस लि. यांस 11 सप्टेंबर 2019 रोजी कार्यादेश देण्यात आले असून काम पूर्ण करण्याची तारीख 31 मार्च 2024 अशी होती. सद्या वाढीव मुदतवाढ दिली असून ती तारीख एप्रिल 2025 अशी आहे.मे. जे.कुमार इंफ्राप्रोजेक्टस लि. तर्फे कामात करण्यात आलेल्या दिरंगाईमुळे त्यास 22 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. हा दंड मे. जे.कुमार इंफ्राप्रोजेक्टस लि. तर्फे अदा केलेला आहे.अनिल गलगली यांच्या मते या मार्गिकेमुळे घोडबंदर मार्गावर मेट्रोचा पर्याय निर्माण होणार आहे. त्यामुळे युद्धस्तरावर काम होणे आवश्यक आहे. मेट्रो 4 अ गायमुख ते शिवाजी चौक, मेट्रो 10 आणि कासारवडवली, ठाणे ते वडाळा मेट्रो 4 या दोन मार्गिकांना जोडणारी मार्गिका आहे.